वेंगुर्ले /वार्ताहर-
पाल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकित ग्रामपंचायत सदस्य व नाभिक समाजाचे कार्यकर्ते विनोद धाकू चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.पाल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक, निवडणुक अधिकारी ग्रामसेवक गणेश बागायतकर यांच्या उपस्थितीती पार पडली. या निवडणुकिसाठी सकाळी 10.30 वाजता विनोद धाकू चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. व तो अर्ज वैद्यहि ठरला. निवडणीकिच्या नियमानुसार दुपारी 3 वाजता उपसरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केलेले विनोद धाकू चव्हाण यांची निवड बिनविरोध झाल्याचे गणेश बागायतकर यांनी जाहिर करून सर्व प्रथम त्यांचे पुषगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी उपस्थित असलेले पाल ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकृष्ण मेस्त्री यांनी गावचे प्रथम नागरीक म्हणून नवनिर्वाचित उपसरपंच विनोद चव्हाण यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य वासुदेव बर्वे, माजी उपसरपंच मंगल गावडे, ग्रामपंचायत सदस्य गीता नाईक, संध्या गावडे, सायंगो पालकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिपक गावडे, सामाजिक कार्यकर्ते गंगाराम गावडे, आनंद चव्हाण, संतोष चव्हाण यासह गावातील ग्रामस्थांनी उपसरपंच विनोद चव्हाण यांचे अभिनंदन केले.