50 वर्षीय निकोल अन् तिचा पती करता दिवसरात्र सेवा
दिव्यांग श्वान अन् मांजरांसाठी घराला केले संरक्षित क्षेत्र
50 वर्षीय निकोल वुफेकुल यांना पाळीव प्राण्यांबद्दल प्रचंड आत्मियता असल्याने त्यांनी घरात 26 श्वान आणि मांजरं पाळली आहेत. निकोल अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये राहतात. श्वानांचा आकडा मोठा असल्याने त्यांचे घर सेंचुरीत (एकप्रकारचे अभयारण्य) रुपांतरित झाले आहे. निकोल यांनी 2216 मध्ये पाळीव प्राण्यांना घरात आणण्यास सुरुवात केली होती. सर्वप्रथम त्यांनी दोन मांजरांना घरात आणले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या घराला नॉन प्रॉफिट सेंचुरी म्हणून नोंदणीकृत केले आणि याला त्यांनी ‘लेनन्स लिगेसी’ नाव दिले.
निकोल यांनी स्वतःच्या सेंचुरीत एक अंध आणि बहिऱया भारतीय भटक्या श्वानालाही स्थान दिले आहे. त्यानंतर निकोल चालण्या-फिरण्यास असमर्थ मांजरं आणि श्वानांच्या सेवेत मग्न झाल्या. त्यांच्याकडे असलेली बेले नावाचे मांजर व्हिलचेअरच्या मदतीनेच हिंडू शकत होते. याचबरोबर 22 श्वान आणि दोन बकऱया देखील निकोल यांच्या सेंचुरीत आहेत.
निकोल स्वतःच्या देखभालीद्वारे या सर्व प्राण्यांना सुरक्षित जीवन देऊ इच्छितात. तसेच दिव्यांग आणि ज्यांना सदैव देखभालीची गरज असलेल्या पाळीव प्राण्यांकडे लोकांचे लक्ष आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 4 आठवडय़ांपासून रुग्णालयात असलेला आणि अंध श्वान जूड त्यांनी घरात आणला आहे. या सर्व कार्यात निकोल यांना त्यांचा पती डीनकडून पूर्ण पाठिंबा मिळतो. ते दोघेही मिळून या प्राण्यांची उत्तम देखभाल करतात.