सोलापूर प्रतिनिधी
पावणे नऊ कोटींचा मूल्यवर्धित कर न भरल्याने व्यापार्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राज्यकर अधिकारी रमेश देवकाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीषकुमार मुकीम (रा. मनीकटला, कोलकाता, सध्या रा. वीरशैवनगर, विजापूर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 1 एप्रिल 2015 ते 30 जून 2017 या कालावधीत मुकीम यांनी मूल्यवर्धित कर कायदा 2002 व केंद्रीय विक्रीकर कायदा 1956 अन्वये नोंदणी दाखला टीन क्रमांक 272511 38930 व्हीसी धारण केला आहे. त्यांनी वरील कालावधीत आठ कोटी 70 लाख 19 हजार 170 रुपये व त्या रकमेवरील व्याज इतका कर भरलेला नाही. याबाबत त्यांना कार्यालयाकडून निर्धारण आदेश, पत्रे व कारणे दाखवा नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. तरीदेखील त्यांनी कर न भरल्याने विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक फुलारी हे करीत आहेत.