संतोष माने / उचगाव
‘पावनखिंड’ हा ऐतिहासिक चित्रपट पाहून आल्यानंतर आपणही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असुन आपली मराठी संस्कृती जपली पाहीजे,देशासाठीची असीम निष्ठा बाळगली पाहीजे या विचाराने प्रेरित होवून उचगाव (ता.करवीर ) येथील एक जोडपे मावळ्यांच्या वेशात चित्रपट पाहण्यास कोल्हापूरात पुन्हा गेले.पैलवानांचे उस्ताद जयवंत पाटील व त्यांची पत्नी आंतरराष्ट्रीय धावपट्टू सौ.अनिता पाटील या मावळ्यांच्या वेशभूषा घालून पीव्हिआर येथे चित्रपट पाहायला गेले व तरुणांत एकच चैतन्य व उत्साह निर्माण झाला.
याआधीही पाटील पती पत्नींनी अनोखे सामाजिक उपक्रम घेतले आहे.आपल्या राहत्या घरात तिसऱ्या मजल्यावर बजरंग आखाडा काढून लालमातीत अनेक मुले व मुली पैलवान तयार केले आहेत.वयाच्या ४६ व्या वर्षी मॕरेथान जिंकून तसेच विक्रमी सुर्यनमस्कार आंतरराष्ट्रीय धावपट्टू असे अनेक विक्रम अनिता पाटील यांच्या नावावर आहे.वस्ताद थंडाई हे पौष्टिक पेय त्यांनी काढले आहे.याच धर्तीवर तरुणांमध्ये,मराठी माणसांमध्ये ऐतिहासिक जागृती होवून नवचैतन्य यावे,संस्कृती टिकावी यासाठी मराठमोळी वेशभूषा करुन चित्रपट पाहणे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पावनखिंड हा चित्रपट पाहून आल्यावर आपल्या देशावर,राजावर,मातीवर जीव ओवाळून टाकणारी मावळे पाहून आपणही तरुणाईला हाच सळसळता संदेश देण्यासाठी मावळ्यांच्या वेशात चित्रपट पाहण्यास गेलो. छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य,सुराज्याच्या मावळ्यास मानाचा मुजरा – पाटील दाम्पत्य