सिनसिनॅटी : रशियाची महिला टेनिसपटू ऍनास्तेशिया पावल्युचेंकोव्हाला व्हिसाच्या समस्येमुळे डब्ल्यूटीए टूरवरील सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेला मुकावे लागत आहे. पावल्युचेंकोव्हाने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.
गेल्या आठवडय़ात माँट्रियल येथे झालेल्या टेनिस स्पर्धेत पावल्युचेंकोव्हाचे आव्हान दुसऱया फेरीतच समाप्त झाले होते. सिनसिनॅटी टेनिस स्पर्धेत पावल्युचेंकोव्हाचा सलामीचा सामना अमेरिकेच्या पेरा बरोबर मंगळवारी खेळविला जाणार होता. पण व्हिसा समस्येमुळे ती या स्पर्धेसाठी वेळेवर उपस्थित राहू शकली नाही. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पावल्युचेंकोव्हाला उपांत्यपूर्व फेरीत बेन्सिककडून पराभव पत्करावा लागला होता.