विविध ठिकाणी झाडांची पडझड : नदी व नाले दुथडी भरून वाहू लागले
पेडणे / प्रतिनिधी
पेडणे तालुक्मयात पावसाच्या संततधारामुळे तसेच मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. वीज वाहिन्यावर झाडे पडून मोठय़ा प्रमाणात हानी झाली. वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे जनजीव विस्कळीत झाले.
बुधवारी पावसाने राञी तर कहरचा केला. गुरुवारी पावसाची संततधारा तशीच सुरु होती. धो धो पडलेल्या पावसाने तेरेखोल तसेच शापोरा नदीची दुधडी भरुन वाहू लागली . ओहळ , तलाव तुडुंब भरुन पाणी जोराने वाहू लागले. शेतीत जमिनीत भरले पाणी. शेतकऱयांना त्यामुळे शेतीकामे करण्यास अडथळा निर्माण झाला.
ड़ पेडणे तालुक्मयात विविध ठिकाणी पडलेली झाडे
उगवे येथे काजूचे झाड रस्त्यावर पडले. नईबाग येथेही काजूचे झाड रस्त्यावर पडले. हिरा फार्म वजरी येथेही जंगली झाड रस्त्यावर पडले. हरमल येथे रववनाथ मंदिर जवळ वडाचे रस्त्यावर मोडून पडले.तांबोसे येथे वीजवाहन्यावर आंब्याचे झाड पडून वीज वाहिन्या तुटल्या.मांदे येथेही आंब्याचे झाड पडले. केरी येथे माड वीज वाहन्यावर पडला.
पराष्टे येथे जंगली झाड रस्त्यावर पडले.
नानेरवाडा पेडणे येथे मोहिनी देशप्रभू यांच्या घरावर झाड पडून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. ही सर्व झाडे पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गावस , उपअधिकारी ,प्रशांत मांदेकर जयराम मळीक, यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे जवान फटू नाईक , जायराम शेटगावाकर, प्रमोद गवंडी, शेखर मयेकर , प्रशांत सावळ देसाई, रतन परब , यशवंत नाईक, विठ्ठल परब , शैलेश हळदणकर, विशाल पाटील, सदाशिव चोडणकर , मनोज साळगावकर , श्याम आरोंदेकर, मयुर नाईक, आशीर्वाद गाड, अमोल परब यांनी झाडे कापून बाजूला करत रस्ता मोकळा केला.