प्रतिनिधी / कणकवली:
गांगोमंदिर ते टेम्बवाडी रस्ता सातत्याच्या पावसामुळे पूर्णत: चिखलमय झाला होता. याबाबतची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांना समजताच त्यांनी तात्काळ दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले.
शहरातील गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेंबवाडी या रस्त्याची संततधार पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तात्काळ घटनास्थळी जात पाहणी करून रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. नवीन डीपी प्लॅन नुसार सुसज्ज रस्ताही या मार्गावर तयार होणार आहे. मात्र, भूसंपादनाअभावी टेंबवाडी भागातील आम्रपाली इमारती समोरील, आणि सावंत यांच्या घरासमोरील रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे.
संततधार पावसामुळे आम्रपाली अपार्टमेंटसमोरील नगरपंचायतीचा रस्ता पूर्ण चिखलमय झाला होता. या रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असल्याने टेंबवाडीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.