वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
यजमान विंडीज आणि पाकिस्तान यांच्यात येथील सबिना पार्क मैदानावर दुसरी क्रिकेट कसोटी खेळविली जात आहे. या कसोटीतील शनिवारचा संपूर्ण दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला.
शनिवारी मुसळधार पावसामुळे मैदानावर पाणी साचले होते. पावसाने विश्रांती न घेतल्याने पंचांनी अखेर दुसऱया दिवशीचा खेळ रद्द केल्याचे जाहीर केले. या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी पाकने पहिल्या डावात 4 बाद 212 धावा जमविल्या होत्या. या मालिकेत विंडीजने पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर विंडीजचा संघ पाकविरूद्ध पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.