सातारा : महाराष्ट्र केसरीचा आखाडा सुरू होण्यासाठी थोडा अवधी राहिला असतानाच सातारा शहर व परिसरात तुफानी पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचे राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.
येथील छ. शाहू क्रीडा संकुलात आज सायंकाळी महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीच्या स्पर्धा होणार होत्या. या स्पर्धेसाठी
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शौकिन उपस्थित राहण्याची शक्यता होती. तत्पूर्वीच साताऱ्यात तुफानी पाऊस सुरू झाला. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.