प्रतिनिधी / पणजी
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 27 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली आहे. ते अधिवेशन साधारणपणे 3 आठवडय़ांचे राहिल असा अंदाज त्यांनी प्रकट केला आणि त्याचा नेमका कालावधी लवकरच ठरवण्यात येईल असे सांगितले.
मागील विधानसभा अधिवेशन फेब्रुवारी 2020 मध्ये झाले होते आणि त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर कोरोनाचे संकट सुरू झाल्यामुळे अधिवेशन घेता आले नाही. दोन अधिवेशनात सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ असू नये म्हणून ते आता जुलैमध्ये निश्चित केले आहे.