प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील पावस बाजारपेठ येथे 21 वर्षीय तरूणाला मारहाण करून अपहण केल्याची धक्कादायक घडना घडल़ी ही घटना शुक्रवारी दुपारी 11 च्या सुमारास घडल़ी विशाल विलास रजपूत (21, साखरी नाटे, राजापूर) असे अपहरीत तरूणाचे नाव आह़े विशालला 5 जणांनी सुमोमध्ये कोंबून नेल्याची तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े त्यानुसार पोलिसांनी 5 संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
या प्रकरणी मनोज मंगेश शिर्के (21, नाटे राजापूर) यांनी तक्रार दाखल केल़ी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज व विशाल हे शुक्रवारी सकाळी कामानिमित्त पावस बाजारपेठेत आले होत़े काम आटपून दोघेही एसटी स्टँड येथे उभे असताना सकाळी 11 च्या सुमारास 5 जण सुमो गाडीमधून विशाल याच्याजवळ आल़े. विशाल व तेथे आलेल्या इंसमांमध्ये वादावादी सुरू झाल़ी यातून 5 जणांच्या जमावाने विशाल याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली व विशालला सुमोरमध्ये कोंबून अज्ञात ठिकाणी घेवून गेल़े या तक्रारीनुसार पोलिसांनी 5 अज्ञातांविरूद्ध भादवि कलम 363, 323, 506 सह 34 नुसार गुन्हा दाखल केला आह़े