अर्ज केलेल्यांना प्रथम प्राधान्य : शहर-तालुक्मयातून शेकडो जणांचे पासपोर्टसाठी अर्ज
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने बेळगावसह राज्यातील इतर जिल्हय़ात अनलॉक करण्यात आले. यामुळे आता पुन्हा एकदा सरकारी कार्यालयांतील कामकाज पूर्ववत सुरू होऊ लागले आहे. कॅम्प येथील पोस्ट-पासपोर्ट सेवा केंद्र येत्या 28 जूनपासून पुन्हा सुरू केले जाणार आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत असल्याने पासपोर्ट काढणाऱयांची सोय होणार आहे.
बेळगाव जिल्हय़ात दोन पासपोर्ट सेवा केंदे आहेत. एक कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात तर दुसरे चिकोडी येथे पासपोर्ट सेवा केंद्र आहे. पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने ही दोन्ही पासपोर्ट सेवा केंदे सुरू करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च महिन्यात हे पासपोर्ट सेवा केंद्र बंद करण्यात आले होते. संसर्ग वाढू नये यासाठी बेंगळूर येथील कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्र बंद होते.
ज्यांनी पासपोर्ट कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अर्ज केले होते, त्यांना याचा फटका बसला. परंतु त्या नागरिकांनाच आता पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. बेळगाव शहर व आसपासच्या तालुक्मयांतून शेकडो जण पासपोर्टसाठी अर्ज करत असतात. परदेशवारी करणाऱयांना पासपोर्ट महत्त्वाचा असल्याने बेळगाव पासपोर्ट कार्यालयात नेहमीच नागरिकांची गर्दी असते. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता पुन्हा एकदा हे कार्यालय गजबजणार आहे. परंतु नागरिकांनीही सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन पोस्ट कार्यालयातर्फे करण्यात आले
आहे.
रोज 40 अर्जांची होणार पडताळणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन महिने पासपोर्ट सेवा केंद्र बंद होते. आता कोरोना आटोक्मयात आल्याने 28 जूनपासून पोस्ट-पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले जाणार आहे. दररोज 40 जणांच्या अर्जांची व त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
– एच. बी. हसबी (बेळगाव पोस्ट अधीक्षक)