प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमध्ये पोस्ट-पासपोर्ट सेवा केंद्र मुख्य पोस्ट कार्यालयात सुरू करण्यात आले. परंतु ते दुसऱया मजल्यावर असल्याने दिव्यांग व जे÷ांना त्याचा फटका बसत होता. यासाठी सेवाकेंद्राचे नव्या जागेत स्थलांतर करण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालयाच्या परिसरातच असणाऱया दुसऱया इमारतीत नवे व सुसज्ज कार्यालय असणार आहे.
पोस्टाच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. परंतु ती जागा अपुरी पडत होती. तसेच होणारी गर्दी पोस्ट खात्याच्या इतर कामांवर परिणाम करीत होती. त्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्राला दुसरी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला होता. पोस्ट विभागाने कार्यालयाशेजारी असणारी जुन्या इमारतीचे नुतनीकरण केले असून त्याठिकाणी कार्यालय सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात पासपोर्ट विभागाचे पथकही या जागेची पाहणी करून गेले.
नविन कार्यालय असणार हायटेक
नविन कार्यालयात नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना कमी वेळेत पासपोर्ट काढता येणार आहे. तसेच कर्मचाऱयांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. 2 कायमस्वरूपी तर 1 अतिरीक्त कर्मचाऱयांची नेमणूक झाली आहे. कर्मचाऱयांची संख्या वाढविल्याने पासपोर्ट काढणाऱयांना उपयुक्त ठरणार आहे.
पोसपोर्ट कार्यालय सुरू होण्यास अजून विलंब
राज्यातील इतर पासपोर्ट कार्यालये सुरू होवूनही बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्र केव्हा? सुरू होणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. नविन कार्यालय जरी या सेवाकेंद्राला मिळाले असले तरी ते सुरू होण्यास ऑक्टोबर उजाडण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना पासपोर्टसाठी अजून काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.