पिंपरी / प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शतक पार केले आहे. यामध्ये सर्वाधिक तरुणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. 22 ते 39 वर्षातील 45 तरुणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. तर फक्त 6 ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 73 वर गेली आहे. तर एकूण रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडत 110 चा आकडा पार केला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे तरुण वयातील आहे. 73 रुणांपैकी तब्बल 45 रुग्ण हे तरुण आहेत. तर अवघ्या सहा ज्येष्ठ नागरिकांना लागण झाली आहे. 13 ते 21 वर्ष वयोगटातील 16 रुग्णांचा समावेश आहे. 40 ते 59 वर्ष वयोगटातील 23 रुग्ण आहेत. तर लहान 11 मुलांना लागण झाली आहे.