वार्ताहर / बिबी :
फलटण तालुक्यातील पिंपळवाडी गावाच्या होळ हद्दीमध्ये शकील अकबर शेख (वय 21, रा जिंती. ता फलटण) या युवकाचा अज्ञातांकडून खून करण्यात आला. होळ प्लॉट नामक शेताच्या चारीमध्ये आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे व फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या उपस्थितीत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.