करमाळा प्रतिनिधी
भरधाव वेगात आलेल्या पिकअपच्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील मलवडी येथे घडली आहे. शिवदास विश्वनाथ पालवे (वय 61) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर पालवे यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.
मंगळवारी (ता. २९) सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. गावाच्या चौकात एका झाडाखाली ४-५ बसलेले असताना पीकप (MH45T4003) चालकाने समोरुन जोराची धडक दिली.
यावेळी बाजूला बसलेले बाकीचे बाजूला झाले मात्र पालवे हे समोरल डाव्या बाजूच्या चाकाखाली गेले, असे तानाजी पालवे यांनी सांगितले आहे.
जखमी झाल्यानंतर त्यांना केम येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदनासाठी आणला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी झालेल्या वादातून हा आपघात केला असल्याचा संशय तानाजी पालवे यांनी केला आहे. दरम्यानं संशयित आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे पालवे यांनी सांगितले आहे.