अबकारी, पोलीस अधिकाऱयांची नागेनट्टी येथे कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
टोमॅटो पिकात गांजा पिकविणाऱया एका शेतकऱयाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी अबकारी विभाग व पोलीस अधिकाऱयांनी नागेनट्टी (ता. बेळगाव) येथे संयुक्तपणे ही कारवाई केली. त्याच्याजवळून गांजाची 82 झाडे जप्त करण्यात आली आहेत.
संजय रामा शहापूरकर (वय 48, रा. नागेनट्टी, ता. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. अबकारी विभागाचे सहआयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त जयरामेगौडा, उपअधीक्षक सी. एस. पाटील आदी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक लिंगराज के., मंजुनाथ मळ्ळीगेरी, मंजुनाथ गलगली व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
नागेनट्टी येथे शेतकऱयाने टोमॅटोच्या पिकात गांजा पिकविल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱयांच्या मदतीने अबकारी अधिकाऱयांनी छापा टाकून संजय शहापूरकर याला अटक केली. त्याने शेतात पिकविलेल्या 6 किलो 920 ग्रॅम वजनाच्या गांजाची 82 झाडे जप्त करण्यात आली आहेत.