वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्रॉसरी आणि इलेक्ट्रॉनिक साहित्यांची खरेदी केली जाते हे आपण पाहत आलो आहोत. परंतु आता व्यावसायिक वाहनांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना पियाजिओ वेहीकल्स प्रा.लि.ने आपल्या तीन चाकी व्यावसायिक वाहनांच्या खरेदीसाठी एक नवीन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सादर केले आहे. सदरची सुविधा ही भारतामधील व्यावसायिक वाहन उद्योगामध्ये पहिलीवहिली मानली जात आहे.
पियाजिओ दुचाकी क्षेत्रात युरोपमध्ये अग्रस्थानी असणाऱया इटालियन पियाजिओ समूहाची पूर्ण हक्क असणारी कंपनी आहे. या अगोदर पियाजिओने 10 जून 2020 रोजी आपल्या दुचाकी वाहनांसाठी ई कॉमर्स वेबसाईट सादर केली आहे.
व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांची गरज लक्षात घेत हा नवीन मार्ग सुरु करण्यात आला आहे. कारण अन्य काही कंपन्यांनी फक्त प्रवासी वाहन खरेदीसाठी आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म सादर केला आहे. परंतु हा एकमेव व्यावसायिक वाहन खरेदीसाठीचा प्लॅटफॉर्म सुरु केला असल्याची माहिती पियाजिओने दिली आहे.
शोरुमला जाण्याची नाही गरज
सर्व डिलर्सची जोडणी ऑनलाईन केली असल्याने ग्राहकांना कोणत्याही शोरुममध्ये प्रत्यक्षपणे जाण्याची गरज नाही. सदरच्या ग्राहकांनी www.aजल्tदस्aत्त्.म्दस् या वेबसाईटला भेट दिल्यास यामध्ये विविध भागांची माहिती शोधणे शक्मय होणार आहे. यामध्ये आवडलेल्या मॉडेलसोबत त्याची खरेदी करण्यापर्यंतची सुविधा ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.