काही राज्यांमधील आकडेवारीचा समावेश नाही
मुंबई : लहान व्यावसायिक वाहनांची निर्मिती करणारी कंपनी पियाजिओने चालू वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 15,206 तीनचाकी मालवाहतूक वाहनांची विक्री केली आहे. ई कॉमर्स कंपन्या आणि डिलिव्हरी व्यवसायातील वाढती मागणीमुळे वाहनांची विक्री तेजीत राहिली असल्याचे पहावयास मिळत आहे. कंपनीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार विक्रीची संख्या नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्यप्रदेश या ठिकाणच्या विक्रीच्या आकडेवारीचा समावेश नाही. पियाजिओचे अध्यक्ष डिएगो ग्रॅफी यांनी म्हटल्याप्रमाणे पियाजिओने भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱया मालवाहतूक तीनचाकी वाहनांचे सादरीकरण केले असून याच वाहनांना अधिकची पसंती मिळत असल्याचेही ग्रॅफी यांनी स्पष्ट केले आहे.
अडचणीसोबत प्रवास सुरुच
आम्ही आर्थिक वर्ष 2021 ते 2022 मध्ये तीनचाकी मालवाहतूक वाहनांना अडचणीचा प्रवास करावा लागत असल्यानंतरही कंपनीने आपले स्थान मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही कंपनीच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. आम्ही विक्री आणि ग्राहक सेवांमध्ये नवीन उत्पादनं तसेच अन्य ग्राहकांना आवश्यक असणाऱया उत्पादनांचे सादरीकरण करत तीनचाकी मालवाहतूक वाहनांच्या विक्रीत आपले नेतृत्व मजबूत ठेवणार असून त्या दृष्टीने प्रवास सुरु ठेवणार असल्याचा विश्वास ग्रॅफी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.