नवी दिल्ली
स्कोडा ऑटो फॉक्सवॅगेन इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) पियुष अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्षामध्ये ते आपल्या नव्या पदाचा कार्यभार 1 मार्च 2022 पासून स्वीकारणार आहेत. या आधी या पदावर गुरुप्रताप बोपाराय कार्यरत होते. मागच्या महिन्यामध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त राहिले होते. भारतामध्ये फोक्सवॅगन समूहाच्या व्यवसायाच्या विस्तारासाठीची जबाबदारी आता अरोरा यांच्यावर राहणार आहे.