प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवार दि. 4 मार्चपासून 6 तारखेपर्यंत पिरनवाडी येथील हजरत शहा सद्रोद्दीन अन्सारी उर्फ जंगलीपीर दर्ग्याच्या उरुसाला जिल्हाधिकाऱयांनी बुधवारी सायंकाळी उशिरा काही अटींसह लेखी परवानगी दिली.
सदर उरुसानिमित्त दर्शनासाठी होणाऱया गर्दीवर नियंत्रण ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर वापरणे सक्तीचे केले आहे.
उरुसाला गुरुवार दि. 4 रोजी पहाटे संदल चढविणे कार्यक्रम होणार असून दि. 5 रोजी प्रसिद्ध कवाली मुकाबिला कार्यक्रम रात्री 10 वाजता होणार आहे. दि. 6 रोजी निजाम अल्लाखान यांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी रात्री ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय सुनीलकुमार व डीएसपी गुडाजी यांनी उरुस ठिकाणी पाहणी करून कमिटीबरोबर बैठक घेऊन मार्गदर्शन केले. व पाहणी करून उरुस शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
उरुसाला परिसरातील हजारो भाविक भेट देऊन आनंद लुटतात. याठिकाणी विविध खेळणी व करमणुकीची क्यवस्था करण्यात आली आहे.