बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
पिरनवाडी (ता. बेळगाव) येथील एक सेक्मयुरिटी गार्ड गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी शुक्रवारी त्याच्या पत्नीने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महांतेश गुरुबसाप्पा हुनशीकट्टी (वय 45) असे त्याचे नाव आहे. तो मुळचा इटगी (ता. खानापूर) येथील राहणारा असून पिरनवाडी येथे सेक्मयुरिटी गार्ड म्हणून काम करतो.
दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पिरनवाडीहून एम. के. हुबळीला जाण्याचे सांगून तो आपल्या घराबाहेर पडला आहे.
5 फुट 4 इंच उंची, अंगाने सडपातळ, काळसर वर्ण असे त्याचे वर्णन आहे. त्याने आपल्या अंगावर पांढरे शर्ट, काळी पॅन्ट परिधान केले होते. वरील वर्णनाच्या सेक्मयुरिटी गार्डविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405252 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.