डॉ. नंदकुमार मोरे यांचे प्रतिपादन : राणी चन्नम्मा विद्यापीठात मार्गदर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
संशोधन प्रक्रिया मोठी असते. पीएचडी ही संशोधनातील पहिली पायरी आहे. संशोधनासाठी आपल्याला अनेक फेलोशिप आहेत. मात्र, त्यांची माहिती घेऊन ती फेलोशिप मिळविणे आपले काम आहे, असे विचार कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे डॉ. नंदकुमार मोरे यांनी मांडले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे शुक्रवारी संशोधन पद्धती या विषयावर आधारित कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांनी केले. अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. विनोद गायकवाड होते. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मैजुद्दिन मुतवल्ली, डॉ. संजय कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक आलगोंडी यांनी केले.