नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी सनी कालरा याचे मस्कतमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. भारतीय तपास यंत्रणांचे हे मोठे यश मानले जात आहे. सुमारे 10 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणाचे आरोप सनी कालरा याच्यावर आहेत.
सनी कालरा हा व्हाईट टायगर स्टील्स प्रा. लि. या कंपनीचा संचालक असून त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) 10 कोटी रुपयांचे कर्ज घतले होते. या कर्जाचा परतावा न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सीबीआयने 2016 मध्ये इंटरपोलला रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीनंतर कालरा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.
कालरा याने विदेशात पलायन करण्याबरोबरच गुप्तपणे माल हलविल्याने बँकेला त्याला दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल करणे अशक्मय झाले होते. याप्रकरणी 16 डिसेंबर 2015 रोजी सीबीआयने एफआयआर नोंदवून तपास हाती घेतला होता. त्यानंतर कालरा आणि त्याची पत्नी फरार झाली होती. मात्र, सीबीआयने पुढे तपास चालू ठेवत 22 डिसेंबर 2016 रोजी कालरा, त्याची पत्नी आणि पीएनबीच्या तीन अधिकाऱयांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.