गडहिंग्लज उपविभागातील चित्र, आयकर भरणाऱ्या 1710 शेतकऱ्यांना नोटीसाआयकर
गडहिंग्लज / रोहीत ताशिलदार
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील एकूण 1 हजार 710 आयकर भरलेल्या शेतकऱयांकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मिळालेले 1 कोटी 61 लाख 20 हजार रूपयाचे अनुदान वसूल करण्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. याबाबत सर्व प्रक्रिया पुर्ण झाली असून तालुका महसूल प्रशासानाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. आयकर भरलेल्या शेतकऱयांची यादी गावनिहाय तयार करून नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. यासह अपात्र शेतकऱयांचाही शोध घेतला जात असून येत्या काही दिवसात ही संख्याही निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आयकर भरणारे शेतकऱयांची आकडेवारी बाहेर पडताच सर्वत्र हा विषय चर्चेचा झाला आहे. यामुळे शासनाचा कोटÎावधी निधी परत शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहेत.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' ही योजना 2018 मध्ये सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्याला 2 हजार या प्रमाणे वर्षाला तीन हप्ते जमा केले. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने निकष निश्चित केले आहेत. मात्र निकष डावलून अनेकजण या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. अशा अपात्र शेतकऱयांकडून या योजनेंतर्गंत घेतलेले अनुदान वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 13 हजार 437 आयकर भरणारे शेतकरी असून पेन्शनर व अन्य 172 शेतकरी अपात्र आहेत. कोल्हापूर जिल्हयातील एकूण 13 कोटी 26 लाख 32 हजार रूपये वसुलपात्र रक्कम आहे.यासाठी तालुका महसूल विभागातून यादी तयार करून आयकर भरणाऱया शेतकऱयांना नोटीसा दिल्या जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात आयकर भरणारे शेतकरी
पीएम किसान’ योजनेतील अनुदान घेतलेले निदर्शनास आले. त्यानंतर शासनाने निकष बदलून शेतकरी लाभार्थ्यांचे आधार लिंक करण्याच्या सुचना दिल्या. यानंतरही आयकर भरत असूनही या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची केंद्र सरकारने यादी जाहीर केली. त्यानुसार गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील एकूण 1 हजार 710 शेतकऱ्यांनी आयकर भरल्याचे समोर आले. यामध्ये सर्वाधिक गडहिंग्लज तालुक्यातील 1 हजार 73 आयकर भरणारे शेतकरी आहेत. या आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी आजवर घेतलेल्या अनुदानाची रक्कम मुदत देवून वसूल केली जाणार आहे. अन्यथा `त्या’ आयकर भरणाऱया शेतकऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जाते.