ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशाला ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजनची हीच समस्या दूर करण्यासाठी देशातील पीएम केअर्स फंडातून सरकारी रुग्णालयांमध्ये 551 हून अधिक ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी देशातील पीएम केअर्स फंडातून 551 वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीएम केअर्स फंडातून या उत्पादन प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
हे ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावेत, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.