ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पीएम केअर्स फंडातील रक्कम राष्ट्रीय आपत्ती मदत निधीत जमा अथवा हस्तांतरित करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वंयसेवी संस्थेने पीएम केअर्स फंडातील रक्कमेवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत म्हटले होते की, पीएम केअर्स फंड राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या फंडात जमा होणारी रक्कम राष्ट्रीय आपत्ती मदत निधीत जमा अथवा हस्तांतरित करता आली पाहिजे.
सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. पीएम केअर फंडातील रक्कम राष्ट्रीय आपत्ती मदत निधीत जमा करता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने ही मागणी फेटाळली.