वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार उत्पादनावर आधारीत प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत मोबाईल फोनची निर्मिती करणारे व पुनर्निमितीसाठी 2020 च्या डिसेंबर तिमाहीत जवळपास 1,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 35,000 कोटी रुपयांच्या किमतीच्या साहित्याचे उत्पादन झाले आहे.
यामध्ये मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स पुनर्निर्माणासाठी पीएलआय योजना 1 एप्रिल 2020 रोजी कार्यरत केली आहे. याच्या आधारेच वर्षानंतर येत्या 5 वर्षांमध्ये विक्रीवर 4 ते 6 टक्क्यांची सवलत मिळणार असल्याची माहिती आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिमाहीमधील आकडय़ाच्या आधारे डिसेंबर 2020 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत योजना प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी पहिले पाच महिने खूप कठीण गेले आहेत. या कठीण कालावधीत प्रस्ताव सादर करणाऱया कंपन्यांकडून योजनेतून जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या किमतीच्या साहित्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. यामधून नवीन रोजगार निर्मितीही होणार आहे. सरकारकडून योजनेच्या अंतर्गत 16 प्रस्तावांची साखळी करण्यात आली आहे. यामध्ये सॅमसंग, फोक्सकॉन होनहाय, रायजिंग स्टार, विस्ट्रोन आणि पेजाट्रोनचाही समावेश आहे. योजनेत भारतीय कंपन्यांनी साखळी केली आहे, यामध्ये लावा, भगवती, युटीएल, पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश राहणार आहे.