ऑनलाईन टीम / श्रीहरिकोटा :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘पीएसएलव्ही-सी51/ एक अमेझोनिया-1’ मोहिमेचे आज सकाळी 10:24 वाजता श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झाले.
पीएसएलव्ही-सी 51 रॉकेट हे पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) चे 53 वे मिशन आहे, यात ब्राझीलचा ॲमेझोनिया -1 हा प्राथमिक उपग्रह आहे आणि इतर 18 पेलोड आहेत. शनिवारी सकाळी 8.54 वाजता या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू झाली होती.
इस्रोचे यंदाचे हे पहिलेच उड्डाण असून, 637 किलो वजनाचा ‘ॲमेझोनिया-1′ भारतातून प्रक्षेपित होणारा ब्राझीलचा हा पहिलाच उपग्रह आहे.