वृत्तसंस्था / पॅरीस
शुक्रवारी झालेल्या प्रेंच कप सॉकर स्पर्धेतील अंतिम सामन्यात पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) संघाने दहा खेळाडूनिशी खेळणाऱया सेंट इटेनी संघाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले.
पॅरिस सेंट जर्मनी (पीएसजी) आणि सेंट इटेनी यांच्यातील हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियममध्ये सदर सामना 5000 हजार प्रेक्षकाच्या उपस्थितीत खेळविला गेला. या अंतिम सामन्यातील एकमेव निर्णायक गोल ब्राझीलच्या नेम्मारने 14 व्या मिनिटाला नोंदविला. या सामन्यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन उपस्थित होते. अध्यक्ष मॅक्रोन यांनी मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्स राखले होते.
चार महिन्यानंतर फ्रान्समध्ये व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रातील सामना खेळविला गेल्यानंतर शौकिनांना त्याचे अर्थातच औत्सुक्य होते. सामना सुरू झाल्यानंतर दुसऱयाच मिनिटाला सेंट इटेनी संघातील पेरीनला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून मैदानावर बाहेर काढल्याने सेंट इटेनी संघाला दहा खेळाडूनिशी खेळावे लागले.