ऑनलाईन टीम / सिकंदराबाद :
बुलंदशहरच्या सिकंदराबाद कोतवाली परिसरातील हायवे क्रमांक 91 वर एका ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पीएसीच्या तंबूत घुसला. या अपघातात पीएसीच्या तंबूत असलेल्या गाझियाबादच्या दोन जवानांना वीरमरण आले. आज पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिकंदराबादमध्ये विविध ठिकाणी सुरक्षा दल आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज पहाटे चारच्या सुमारास महामार्गावर गाझियाबादहून येणारा एक ट्रक पीएसीच्या तंबूत घुसल्याने हा अपघात झाला. अपघातातील दोन्ही जवानांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टेमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.