एक महिना आगोदरच 104 टक्के उद्दिष्ठपार
प्रतिनिधी / कोल्हापूर
पीककर्ज वाटपात कोल्हापूरने पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. 104 टक्के उद्दिष्टÎपूर्ती करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्षपूर्तीच्या एक महिना आगोदर म्हणचे 28 फेब्रुवारीलाच हे ध्येय साध्य झाले. या कामात जिल्हा बँक नेहमीच अग्रभागी असतेच तर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनीही आता कात टाकत भरीव कामगिरी केली आहे. या बद्दल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्वच बँकांची पाठ थोपटली आहे.
जिल्ह्याला पीककर्ज वापटपाचे वार्षिक उद्दिष्ट 2 हजार 480 कोटी देण्यात आले होते. 31 मार्च 2021 पर्यंत हे ध्येय साध्य करण्याची मुदत होती. मात्र फेब्रुवारीअखेरच 2 हजार 584 कोटी इतके वाटप करुन 104 टक्के उद्दिष्ट्यपूर्ती केली. जिल्हास्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठकीत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने यांनी ही माहिती दिली.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विभागीय व्यवस्थापक शिवकुमार, आरसेटीच्या जिल्हा समन्वयक सोनाली माने उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व महामंडळाचे व्यवस्थापक दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 528.41 कोटी अर्थसहाय्य
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 78,849 लाभार्थ्यांना 528.41 कोटी अर्थसहाय्य केली. प्राथमिकता प्राप्त सेवा क्षेत्राकरिता 9 हजार 320 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2020 अखेर जिह्याच्या एकुण उद्दिष्टापैकी 6 हजार 351 कोटी (68 टक्के) इतकी उद्दिष्टÎपूर्ती झाली आहे. डिसेंबरअखेर 30 हजार 642 कोटी ठेवी आहेत. एकुण 24 हजार 201 कोटी कर्जाची शिल्लक असल्याची माहिती माने यांनी दिली.
इचलकरंजी, जयसिंगपूरवर लक्ष द्या – जिल्हाधिकारी दौलत देसाई
महामंडळांकडील तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनाबाबतचे प्रस्ताव ज्या बँकांकडे प्रलंबित आहेत अशा बँक प्रतिनिधींसोबत महामंडळाच्या व्यवस्थापकांची अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांनी बैठक घ्यावी. प्रलंबित प्रकरणे लवकरात-लवकर निकालात काढावीत. इचलकरंजी, जयसिंगपूर या मोठÎा शहरांवर बँकांनी लक्ष केंद्रीत करावे. त्याचबरोबर बँकांनी आपला सीडी रेशोही वाढवावा. पीककर्जात ज्या पध्दतीने काम झालेले आहे तशाच पध्दतीने महामंडळांबाबत संवेदनशील राहून जास्तीत-जास्त प्रस्ताव मार्गी लावावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.
योजना लाभार्थी
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 11,41,378
रूपे कार्ड प्रदान 9,99,356
प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा 4,95,741
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा 1,88,869
अटल विमा योजना 60,847
प्रधानमंत्री मुद्रा योजना 78,849
दुर्ष्टीक्षेपात आर्थिक नियोजन
प्राथमिकता प्राप्त सेवा क्षेत्र आराखडा 9,320 कोटी
31 डिसेंबर 2020 अखेर 6,351 कोटी
डिसेंबरअखेर ठेवी 30,642 कोटी
शिल्लक कर्ज 24,201 कोटीत