ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पीडीपीच्या तीन प्रमुख नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
राज्यसभेचे माजी सदस्य टी.एस. बाजवा, माजी प्रदेश सचिव हसन अली वफा आणि माजी आमदार वेद महाजन अशी राजीनामा दिलेल्या व्यक्तींची नावे आहेत.केंद्र सरकारने हिरावून घेतलेले जम्मू-काश्मीरचे कलम 370 पुन्हा मिळवेपर्यंत तिरंगा झेंडा हाती घेणार नाही, असे वक्तव्य मुफ्ती यांनी केले होते.
या वक्तव्यावरून नाराज झालेल्या नेत्यांनी मुफ्ती यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आतापर्यंत पक्षाच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहिलो. मात्र, तुमच्या देशभक्तीपर वक्तव्याने आम्हाला धक्का बसला आहे. काही घटक पक्षाला चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहेत. त्यामुळे आम्ही पक्षाचा राजीनामा देत आहे.