धरणगुत्ती ता शिरोळ ग्रामपंचायतीच्या वतीने चार थर्मल टेस्टिंग मशीन व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना 15 पी पी इ किट खरेदी करून संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे बहुधा राज्यातील ही पहीलीच ग्रामपंचायत असावी अशी माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी दिली.
कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव राज्यात,देशभरात आणि जगातही दिवसोंदिवस वाढत चालला आहे. केंद्र आणि राज्यशासनाने वेळोवेळी संसर्ग वाढू नये याची काळजी घेतले आहे. दि 24 मार्चपासून देशभरात लॉक डाउन लागू केली आहे. ग्रामपंचायत धरणगुत्तीचा माध्यमातून गावांतील सर्व सामान्य गरजेचे आहे.
आपल्या घरी अथवा परिसरात अनोळखी व्यक्ती आल्यास त्याचाशी संपर्क ठेवू नये व याबाबत ग्रामपंचायतीस कळवावी असे आवाहनही ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले.याप्रसंगी भालचंद्र लंगरे मनोहर माळी .महेश जगदाळे .राहुल मिस्त्री, पोलीस पाटील संभाजी भानुसे, तलाठी गौरव कणवाडकर, ग्रामसेवक गुळवे,आरोग्य सेवक,नागरिक व ग्रा.प.कर्मचारी उपस्थित होते.