नवी दिल्ली
सोमवारी शेअर बाजारात पीव्हीआर आणि आयनॉक्स लीजर यांच्या समभागांमध्ये उसळी दिसली होती. एनएसईवर आयनॉक्सचे समभाग 13 टक्के तेजीसह 531 रुपयांवर तर पीव्हीआरचे समभाग 8 टक्के वाढीसह व्यवहार करत होते.
दोन्ही कंपन्यांचे एकत्रित विलीनीकरण करण्यात आल्याचा परिणाम म्हणून समभागात वाढ दिसली आहे. रविवारी उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विलीनीकरणाला मंजुरी दिली गेली. दोन्ही कंपन्या आपल्या सध्याच्या नावानेच आपली मल्टीप्लेक्स सुरू ठेवणार असल्याचे समजते. दोन्ही संयुक्त कंपनीचे नाव मात्र ‘पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड’ असे राहणार आहे.
109 शहरात 1546 स्क्रीन्स
भारतातील आघाडीवरची मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआरने दुसरी मोठी मल्टीप्लेक्स चेन आयनॉक्स लीजरला विलीनीकरणात सामील करून घेतले आहे. यात आयनॉक्सचा वाटा अधिक असणार आहे. येत्या काळात 109 शहरांमध्ये 1546 इतक्या स्क्रीन्सची व्यवस्था केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
याचदरम्यान विलीनीकरण झालेल्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अजय बिजली हे राहणार आहेत. पवन कुमार जैन हे मंडळावर बिगर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमले जातील, असे समजते.