ऑनलाईन टीम / लखनऊ :
भारताची स्टार खेळाडू आणि दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. रविवारी लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सिंधूने भारताच्याच मालविका बनसोडचा 21-13 आणि 21-16 असा पराभव केला.
अव्वल मानांकित सिंधूचे हे दुसरे सैयद मोदी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धा विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने 2017 मध्ये विजेतेपद जिंकले होते. आजचा अंतिम सामना 35 मिनिटे चालला. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधु आणि रशियन खेळाडू इव्हगेनिया कोसेत्स्कायाला यांच्यात लढत होती. मात्र, इव्हगेनिया कोसेत्स्कायाला दुखापत झाल्यानं पीव्ही सिंधुला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला होता. उपांत्य फेरीत पीव्ही सिंधुनं 21-11 असा विजय मिळवला. त्यानंतर दुखापतीमुळं कोसेत्स्कायानं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.