जकार्ता (इंडोनेशिया : भारताची विद्यमान विश्वविजेती तसेच सलग दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूने येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
850,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत गुरूवारी सिंधूने जर्मनीच्या ली हिचा 37 मिनिटांच्या कालावधीत 21-12, 21-18 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सातव्या मानांकित सिंधूचा जर्मनीच्या ली बरोबरचा हा पहिला सामना होता. सिंधूने बुधवारी जपानच्या ओहोरीचा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. पुरूष एकेरीत भारताच्या साई प्रणितचा सामना फ्रान्सच्या पोपोव्हशी होणार आहे. दक्षिण कोरियाची युजीन आणि स्पेनची कोरालेस यांच्यातील विजयी खेळाडूविरुद्ध सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे.