ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम याला कोरोनाची लागण झाली आहे. कीर्ती चिदंबरम यांनी स्वतः या संदर्भात ट्विट करत माहिती दिली.
ते म्हणाले, मला कोरोनाची बाधा झाली आहे. माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या होम क्वारंटाइन झालो आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन करतो की, आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.