प्रतिनिधी /पणजी
अखिल भारतीय काँग्रेसचे गोवा राज्य निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम हे दि. 25 रोजी गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. पक्षातील सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
25 आणि 26 ऑगस्ट या दोन दिवसांच्या भेटीवर चिदंबरम गोव्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र त्यासंदर्भातील अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चिदंबरम यांची ही पहिलीच गोवा भेट असणार आहे.