बेळगाव शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला मिळाले यश
प्रतिनिधी /बेळगाव
समर्थनगर येथील शिवारातून राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ता केला जाणार आहे. या रस्त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून बेळगाव शेतकरी संघटनेने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून शुक्रवारी आमदार अनिल बेनके यांनी समर्थनगर येथे जाऊन पी. बी. रोड ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा रस्ता लवकरच केला जाईल, असे ठोस आश्वासन दिले आहे.
यापूर्वी समर्थनगरपासून काही अंतरापर्यंत हा रस्ता झाला होता. मात्र तो रस्ता अर्धवटच आहे. हा रस्ता शेतकऱयांना तसेच सर्वांना महत्त्वाचा आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी वारंवार होत होती. बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी नेहमीच यासाठी पाठपुरावा केला. या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
शुक्रवारी शेतकऱयांच्या उपस्थितीत ही माहिती आमदारांनी दिली. प्रारंभी हा रस्ता कच्चा केला जाईल, त्यानंतर रस्त्याचे रुपांतर पक्क्मया रस्त्यामध्ये होईल. पी. बी. रोड ते थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्त्यावरून जाता येणार आहे. सध्या पावसाळय़ामध्ये ये-जा करणे कठीण जात आहे. सर्वत्रच चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे हा रस्ता झाला तर शेतकऱयांना फायदेशीर ठरणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शेतकरी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.