ऑनलाईन टीम
भारताच्या पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या ही बिंग जिआओला नमवत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. रविवार दि. १ ऑगस्ट रोजी हा सामना पार पडला.
पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाची दावेदार होती. मात्र शनिवारचा सामना गमावल्याने सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी आज झालेला सामना जिंकत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनची खेळाडू ही बिंग जिआओला २१-१३, २१-१५ अशा फरकाने नमवले आहे. बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानच्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूचा पऱाभव केला होता.