विधनासभा निवडणुकीला सामोरे जाणाऱया पुड्डुचेरीमध्ये भाजपने स्वतःचे घोषणापत्र सादर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. केंद्रशासित प्रदेशात 30 जागांवर एकाच टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर निकाल 2 मे रोजी लागणार आहे.
भाजपचे घोषणापत्र ‘न्याय’ची गोष्ट मांडते. जनतेकडून सूचना प्राप्त करत हे घोषणापत्र तयार करण्यात आले आहे. एसी रुममध्ये बसून घोषणापत्र तयार करण्यात आलेले नाही. पंतप्रधान मोदी स्वतःची आश्वासने पूर्ण करत असल्याचे जनता पाहत आहे असे विधान सीतारामन यांनी केले आहे.
भाजपने घोषणापत्रात तरुणाईसाठी 2.5 लाख नवे रोजगार निर्माण करणे, सर्व मच्छिमारांसाठी 6 हजार रुपये प्रतिवर्षाची आर्थिक मदत आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत स्कुटी देण्याचे आश्वासन दिले आहे. पुड्डुचेरीसाठी 5 वर्षीय जलसुरक्षा योजनेचा प्रारंभ आणि राष्ट्रीय गोकूळ मोहिमेच्या अंतर्गत एकीकृत गोविकास केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.