बिजिंग
चिनी मोबाइल निर्माती कंपनी ओप्पोचा स्मार्टटीव्ही पुढच्या महिन्यात लाँच केला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ओप्पोच्या विकासविषयक बैठकीत ही माहिती देण्यात आली. याच बैठकीत कंपनीने कलर ओएस 11 मोबाइल व ओप्पो वॉच इसीजी एडिशनचे मॉडेल सादर केले आहे. पुढच्या महिन्यात बाजारात दाखल होणाऱया स्मार्ट टीव्हीबाबत अधिक माहिती मात्र कंपनीकडून देण्यात आलेली नाही. कंपनी भविष्यात आयओटी नेटवर्क विस्तारावर भर देणार असल्याचे समजते. कंपनीकडून 55 इंची आणि 65 इंची स्मार्टटीव्ही बाजारात ऑक्टोबरमध्ये दाखल केले जाणार आहेत.