औद्योगिक कौशल्य समाविष्ठ होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
डिप्लोमा अभ्यासक्रम हा जुना झाल्यामुळे सध्या औद्योगिक क्षेत्रात नोकऱया मिळविण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रात रोज नवनविन तंत्रज्ञान येत असतानाही डिप्लोमा अभ्यासक्रम मात्र जुन्याच पद्धतीने सुरू असल्यामुळे याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करून औद्योगिक क्षेत्राला गरज असणारा अभ्यासक्रम पुढील वर्षीपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तज्ञ मंडळींचा सल्ला घेतला जात असून, विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
प्रत्येक 5 वर्षांनी डिप्लोमा अभ्यासक्रम बदलला जातो. 2015 साली अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. आता 2020 साली नव्याने अभ्यासक्रम अंतर्भूत केला जात आहे. हा नवा अभ्यासक्रम 2021 मध्ये लागू केला जाणार आहे. आयआयटी सारख्या नामांकित संस्थांकडून मार्गदर्शन घेऊन अभ्यासक्रम तयार केला जात असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी बेंगळुर येथे नुकतीच दिली.
कालबाहय़ अभ्यासक्रम असल्यामुळे डिप्लोमाला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडवली आहे. घेतलेले शिक्षण व प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रातील काम यात जमीन आसपानाचा फरक असल्याने नोकरी लागल्यानंतर विद्यार्थ्यांना नव्याने सर्व गोष्टी शिकाव्या लागत होत्या. जुन्या अभ्यासक्रमाचा फटका कंपन्यांनाही सहन करावा लागत होता. विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडला तरी त्याच्याकडे कौशल्य मात्र काहीच नसल्यामुळे त्यांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी कंपन्यांना खर्च करावा लागत होता.
दरवषी राज्या 40 हजारांहून अधिक डिप्लोमा पदवीधर उत्तीर्ण होतात. परंतु त्यापैकी 20 टक्के विद्यार्थ्यांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच राज्य सरकारने अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक क्षेत्रात जे कौशल्य गरजेचे आहे ते अभ्यासक्रमातून देण्याचा प्रयत्न नव्या अभ्यासक्रमातून केला जाणार असल्याचे अश्वथनारायण यांनी सांगितले. यामुळे नवा अभ्यासक्रम नेमका कसा असणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे.