पुणे \ ऑनलाईन टीम
पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणेकरांना आता फक्त आणि फक्त १० रूपयात दिवसभर गारेगार प्रवास करता येणार आहे. फक्त १० रुपयात दिवसभर एसी बस प्रवास योजनेचा लोकार्पण सोहळा आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.
पुण्यातील प्रवाशांचा आणि वाहतूक सेवांचा विचार करुन एसी बससेवा सुरु केल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी पुणे पालिकेचे अभिनंदन केले. १० रुपयात एसी बस सेवा ही अतिशय कल्पक योजना असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी या योजनेचे कौतुक केले.
या एसी बस पूर्णपणे इलेक्ट्रिक बस आहेत. पुण्यात पहिल्या टप्प्यात ५० एसी बस धावणार आहेत. या बसेसमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्याच्या हेतूने पुणे पालिकेकडून पुण्यात ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. या लोकार्पण सोहळ्याला देवेंद्र फडणवीसांसोबतच चंद्रकांत पाटील, गिरीश बापट देखील उपस्थित होते.