ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केईएम हॉस्पिटलच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एका महिलेने उडी मारून आत्महत्या केलाचा प्रकार सोमवारी सकाळी घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, यासना मुकेश बकसानी असे या मृत महीलीचे नाव आहे. संबंधित महिला पुण्यातील वानवडी भागात राहत होती. आत्महत्येपूर्वी या महिलेनेे चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात कोणावरही तक्रार नाही असेे म्हटले आहे. मात्र,आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
संबंधित महिलेच्या नवऱ्याचे तीन महिन्यापूर्वी कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. तसेचतिच्या 13 वर्षीय मुलावर केईएम रुग्णालयातच उपचार सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज पहाटे चार साडेचारच्या सुमारास यासनने रुग्णालयातील ग्रील नसलेल्या खिडकीतून उडी टाकून आत्महत्या केली. या प्रकरणी समर्थ पोलीस अधिक करत आहेत.