पुणे / प्रतिनिधी :
अलिबागजवळ निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर ते पुढे उत्तर पूर्वेच्या दिशेने जाणार असून, यामुळे पुणे-नगर-नाशिक-औरंगाबाद तसेच बीड जिल्हे प्रभावित होणार आहेत. या भागात बुधवारी दिवसभर मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा असून, वाऱ्याचा वेग हा ताशी ६० ते ७५ किमी इतका राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे या भागात हे सतर्कतेचा आदेश असून, नुकसानीची शक्यता आहे.