ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद उर्फ बळवंत यांनी छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विश्राम बाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातील लक्ष्मी रोडवर मराठे ज्वेलर्स हे दुकान आहे. मिलिंद हे मंगळवारी लक्ष्मी रोडवरील दुकानात होते. सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्यांच्या ऑफिसमधून अचानक आवाज ऐकू आला.
त्याबरोबर दुकानातील कर्मचारी आवाजाच्या दिशेने धावले असता त्यांनी पाहिले की, मराठे यांच्या छातीत गोळी लागली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, अद्याप मराठे यांनी आत्महत्या का केली याचा शोध लागला नाही आहे.