प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर महामार्गावरील काकती गावानजीक उच्च विद्युतभारित वाहिन्यांसाठी लावण्यात आलेला विद्युतखांब वाकून एका बाजूला कलंडला आहे. यामुळे हा खांब महामार्गावर केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. हा खांब महामार्गावर कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. त्यामुळे एखाद्या निरपराध्याचा जीव जाण्यापूर्वी हेस्कॉम व केपीटीसीएलच्या कर्मचाऱयांनी त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
बर्डे धाब्यानजीक दोन वर्षांपूर्वी महामार्गावरून एका बाजूने दुसऱया बाजूला मुख्य वीजवाहिनी ओढण्यात आली होती. यासाठी लोखंडी खांब उभारण्यात आले होते. परंतु यातील एक खांब विद्युत वाहिनीच्या ओझ्यामुळे एका बाजूला कलत चालला आहे. तो खांब केव्हा मोडून पडेल याची शाश्वती नाही. महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. या वाहनांवर हा खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्मयता आहे.
हेस्कॉम-केपीटीसीएलचे दुर्लक्ष
मुख्य महामार्गावरील विद्युत खांब कोसळायला आला तरी त्याच्या दुरुस्तीकडे हेस्कॉम तसेच केपीटीसीएलने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या विभागाच्या गलथान कारभारामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे त्वरित या विद्युत खांबाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांमधून होत आहे.