पहिल्याच दिवशी 61 प्रवाशांनी दिला प्रतिसाद:
प्रतिनिधी/ बेळगाव
अलायन्स एअरने सोमवारपासून पुणे-बेळगाव ही विमानसेवा सुरळीत केली आहे. दुपारी 12.10 वा. पुणे येथून उड्डाण घेतलेले विमान दुपारी 1.35 वा. बेळगावला पोहचले. तर दुपारी 2.20 वा. बेळगाववरून उड्डाण घेतलेले विमान 3 वा. पुण्याला पोहचले. अडीच महिन्यांनी ही सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी एकूण 61 प्रवाशांनी विमान प्रवास केला.
लॉकडाऊननंतर सुमारे अडीच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बेळगाव – पुणे ही विमानसेवा सुरळीत करण्यात आली. पुण्यावरून 29 प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले. तर 32 प्रवासी बेळगाववरून पुण्याला गेले. बेळगावमध्ये आलेल्या प्रवाशांना सरकारी नियमानुसार क्वारंटाईन करण्यात आले.
सध्या सुरू असणाऱया सेवा
स्टार एअरने बेंगळूर, अहमदाबाद, इंदूर, अजमेर या शहरांना विमानसेवा सुरू केली आहे. स्पाईस जेट कंपनीने हैद्राबाद, इंडिगोने हैद्राबाद तर ट्रुजेट कंपनीची हैद्राबाद व म्हैसूर या शहारांना सेवा सुरू आहे. या सेवांना अजून भरघोस प्रतिसाद मिळाला नसला तरी हळुहळु प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई विमानसेवेसाठी स्टार एअर व स्पाईस जेट या कंपन्या प्रयत्न करत असून येत्या कांही दिवसात ही सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे….